खामगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच ; सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात ३ लाख ८१ हजार रुपयांची चोरी
खामगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच ; सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात ३ लाख ८१ हजार रुपयांची चोरी
खामगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून स्थानिक तापडिया नगर भागातील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सेवानिवृत्त शिक्षक आनंदा सुखदेव चांदणे हे कुटुंबासह दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रात्रीदरम्यान चांदणे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील अलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम ८० हजार असा एकूण ३ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. दुसन्या दिवशी चांदणे हे घरी आले असता ही घटना उघडकीस आली. याबाबत त्यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा येथून आलेल्या ठसे तज्ञांनी घराची पाहणी केली असून त्यांना इसमाचे काही संशयात्मक ठस्यांचे नमुने घेऊन गेले आहेत.तर शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. सातत्याने शहर व परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या उघडकीस येत असून पोलिसांचा चोरट्यांवर कुठलाच वचक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.