आमदार रवी राणांविरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन
आमदार रवी राणांविरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन
प्रहार संघटनेने आक्रमक आंदोलन करत आमदार रवी राणांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली.आमदार रवी राणा यांनी बचू कडू यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.याच्या निषेधार्थ ही तिरडी काढण्यात आली. अमरावती या ठिकाणी जाऊन रवी राणांचा पुतळा दहन करू असा इशारा प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला.सोलापूर विजयपूर येथील इंदिरा नगर जवळील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या शेजारी आमदार रवी राणांची तिरडी यात्रा काढण्यात आली.प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांच्या विरोधात रवी राणांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत गुवाहाटीला जाऊन तुम्ही खोके घेतले. ते खोके बाहेर काढा. गोरगरीब नागरिकांना द्या असे सांगितले होते.याविरोधात बच्चु कडू यांनी देखील रवी राणां विरोधात पोलीस तक्रार दिली आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे माझे चारित्र्यहिन झाले आहे अशी तक्रार नमूद करण्यात आली आहे.प्रहार संघटना व त्याचे पदाधिकारी हे नेहमी गोरगरिबांना मदत करत असतात.बचू कडू यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा न करता अनेक गोरगरीब अपंगांना सायकली वाटप केल्या.अशा दानशूर व्यक्ती विरोधात असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदारला धडा शिकवण्यासाठी प्रहार संघटना अमरावतीत जाऊन त्यांचा पुतळा दहन करू.येत्या 1 नोव्हेंबर रोजी ,आमदार रवी राणा विरोधात राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.असे अजित कुलकर्णी यांनी माहिती देताना इशारा दिला.
BYTE : अजित कुलकर्णी, शहर अध्यक्ष प्रहार संघटना