उध्दव ठाकरे यांना वाटतं की, मातोश्री वरुनच लोकांची दु:ख कळतात – मंत्री चंद्रकांत पाटील
उध्दव ठाकरे यांना वाटतं की, मातोश्री वरुनच लोकांची दु:ख कळतात - मंत्री चंद्रकांत पाटील
दोन विरोधी पक्ष असतात ते बऱ्याच वेळेला विचारांच्या आधारे विरोधी असतात. त्यामुळे विचाराची लढाई लढली पाहिजे. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांना हे उशिरा समजलं की, महात्मा गांधी यांच्या सारखे नेते निर्माण झाले कारण की, ते देश फिरले सर्वसामान्य माणसांशी त्यांची संवाद साधला. उध्दव ठाकरे यांना वाटलं की, मातोश्री मध्ये राहुनच लोकांची दु:ख कळतात. आता त्यांना साक्षात्कार झाला आहे. या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहित याची आठवण असायला पाहिजे. विरोधी पक्षाची दखल सत्ताधारींनी घेतली पाहिजे. त्यामुळे ती घेतली जाईल. लोकशाही मध्ये ईच्छा व्यक्त केली तर त्यात काही चुकीचं नाही आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी महाविकास आघाडीला पुन्हा २०४ पर्यंत बहुमत आणायला लागेल. ती आणण्यासाठी २०२५ पर्यंत एकत्र राहणार आहात का? किंवा पक्षातील लोक एकत्र राहणार का? हे प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी वेळ घालवा.
BYTE : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील