अमरावतीबातम्यामहाराष्ट्र
अमरावती विमानतळाची अनिल बोंडेंनी केली पाहणी ; अडीच वर्षापासून काम ठप्प असल्याचा आरोप
अमरावती विमानतळाची अनिल बोंडेंनी केली पाहणी ; अडीच वर्षापासून काम ठप्प असल्याचा आरोप
अमरावती विमानतळाचे काम उपमुख्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर गतीने सुरू झाले आहे. एक वर्षापेक्षा कमी कालावधीत संपूर्ण काम पूर्ण होऊन सेवा निश्चितपणे सुरू होईल, असा विश्वास खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. अनिल बोंडे यांनी अमरावती विमानतळावरून कामाचा आढावा घेतला. गेल्या अडीच वर्षापासून विमानतळाचे काम ठप्प पडले होते असा आरोप अनिल बोंडे यांनी केला तर डिसेंबर 2023 पूर्वी विमातळाची सर्व कामे पूर्ण होतील व या विमानतळावरून अमरावती – मुंबई व अमरावती – पुणे असे दोन मार्ग सुरूवातीला सुरू करण्याची मागणी आम्ही केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्याकडे करणार असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी सांगितले.
बाईट – अनिल बोंडे,भाजप खासदार