बातम्यामहाराष्ट्रमुंबई

डोंबिवलीची मध्यवर्ती शाखेवरुन बाळासाहेबांच्या शिवसेना आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात वाद

डोंबिवलीची मध्यवर्ती शाखेवरुन बाळासाहेबांच्या शिवसेना आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात वाद

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची यावरून अंदाजे दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात वादा वादी झाली होती. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा हा वाद उफाळला असून ही शाखा आमचीच आहे असा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून करत या शाखेवर मोठ्या प्रमाणात कार्यकार्याची गर्दी करण्यात आली . विशेष म्हणजे कोरोना कालखंडाच्या आधीपासूनच या शाखेच्या जागेची विक्री कराराचे काम सुरू होते व ते आता अधिकृत पणे आमच्या नावावर झाल्याचा दावा या वेळी शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून आता ही शाखा बाळासाहेबांच्या शिवसेनेची असल्याचे सांगण्यात आले आहे तर या वेळी शाखा ताब्यात घेतल्या नंतर ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्यांनी शाखेवर मोठा गोंधळ घातला असून सध्या या शाखेवर तणावाचे वातावरण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे एकीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे समर्थकांचा गोंधळ दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना गटाची कार्यकर्त्यांची शाखेवर नारेबाजी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button