अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकरमणूकजळगावनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईयवतमाळ
Trending

डोंबिवलीत मामाने केली भाच्याची हत्या,

आई-वडिलांसमोरच चाकूचे सपासप वार

कल्याण

दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरात उत्साह व आनंदाचे वातावरण असताना या आनंदावर विरजण टाकणारी बातमी डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा विनायक कुंडल सोसायटीत घरगुती वादातून मामाने सख्ख्या भाच्याची चाकू भोसकून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. यश संजय तिवारी असे हत्या झालेल्या भाच्याचे नाव आहे. तर सतीश राजनारायण दुबे असे आरोपी मामाचे नाव आहे. पोलिसांच्या माहिती नुसार आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी यांच्या घरीच रहात होता. सरिता यांच्या घरात तिचा पती, मुलगा यश व सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असेचार जण एकत्र रहात होते. घरगुती वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी भांडण सुरू केले. शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करण्यास धावत होता. भांडण सोडविण्यासाठी भाचा यशयाने हस्तक्षेप केला त्याचा राग सतीशला आल्याने त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने सर्वांसमोर यशवर सपासप वार केले व तेथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशचा जागीच मृत्यू झाला असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी मामालाबेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे.

BYTE – सुरेश मदने, तपास अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button