बातम्यामहाराष्ट्रमुंबई
डोंबिवली फडके रोडवर उगवली तरूणाईची दिवाळी पहाट
डोंबिवली फडके रोडवर उगवली तरूणाईची दिवाळी पहाट
गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर जमण्याची परंपरा आहे.जुन्या जाणत्यांनी सुरू केली ही परंपरा आजही सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावच्या वेशीवर असलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जुनी जाणती मंडळी जमत असत. तीच परंपरा पुढे सुरू राहिली आणि बघता बघता फडके रोडवर दिवाळीच्या दिवशी तरूणाई फुलू लागली.पहिल्या दिवशी आपले आप्त,मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासून तरूण,तरूणी फडके रोडवर जमले असून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे या अनेक विविध कार्यक्रम सुरू आहेत आणि नागरीकांना आकर्षक करण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांनी देखील उपस्थि लावली.