पनवेल | दिवाळीसाठी पूर्ण इकोफ्रेंडली जादूचे आणि आकर्षक दिवे
पनवेल | दिवाळीसाठी पूर्ण इकोफ्रेंडली जादूचे आणि आकर्षक दिवे
मागील वीस वर्षा पासून पनवेल मधील युसूफ मेहेरअली सेंटरमध्ये पर्यावरण पूरक वस्तू बनवल्या जातात,यावेळी दिवाळीसाठी खास दिव्यांची निर्मिती करण्यात आली आहे.बेळगाव,कर्नाटक मधून येणाऱ्या तेरकोटा मातीपासून या दिव्यांची निर्मिती करण्यात आली आहे,ज्यामुळे पूर्ण अस्सल मातीचे हे दिवे वापरताना पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहचत नाही.त्यात एक जादूचा दिवा बनवला असून,त्यात तेल घालून पेटवला तर तब्बल सहा तास चालू राहतो.एथिल काही अदिवाशी मुळेही अशा वस्तू बनवतात,तर यातून जो काही आर्थिक भांडवल जमा होतो तो याच मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो असे येथील सदस्य सांगतात.मात्र अत्यंत आकर्षक आणि परवडणारे दिवे इथे मिळत असल्याने या दिव्यांना मुंबईसह राज्याच्या अनेक ठिकाणाहून मोठी मागणी असते.
बाईट – दत्ता शिंगणे
सदस्य, यु.मे.सेंटर