सत्तेत असताना केव्हा बांधावर गेलो का आठवावं अशी उद्धव ठाकरेंवर दिपक केसरकरांनी टीका केलीय
सत्तेत असताना केव्हा बांधावर गेलो का आठवावं अशी उद्धव ठाकरेंवर दिपक केसरकरांनी टीका केलीय
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली, यावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी टीका केली आहे. जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा केव्हातरी बांधावर गेले की नाही याची आठवण ठेवावी लागते. सत्तेत असताना कुठलेच निर्णय घेतले नाहीत. आता पंचनामे लवकर होतायेत, नुकसान भरपाई दुप्पट मिळते. हे पूर्वी का होऊ शकला नाही अशी खोचक टीका देखील हे केसरकरांनी उद्धव ठाकरेवर केली.
बाळासाहेबांची इच्छा होती शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, मात्र त्यांचं सरकार असताना कुठलीच योजना राबवली नाही. केवळ लोकांची मत मिळावी यासाठी राजकारण करणे योग्य नाही. तर लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती लागली.
उद्धव ठाकरे यांचं आज पक्षाच्या सहानुभूतीसाठी सगळं काही चाललं आहे. हेच जर जनतेसाठी केलं असतं तर त्यांना अशी फिरायची वेळ आली नसती.
चर्णी रोड स्टेशनवर तीन किलोमीटर लोकांना चालत जावं लागायचं मात्र सहा दिवसात मुंबईचा पालकमंत्री म्हणून खिडकी उपलब्ध करून दिली हे करण्यासाठी इच्छाशक्ती लागते.
सत्ता नाही म्हणून कोणाला हिणवन योग्य नाही, मात्र सत्ता असताना काम केली पाहिजे हे करणारे शिंदे आणि फडणवीस आहेत म्हणून आमचं सरकार चालतं, आमचा पक्ष चालतोय का तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चाललो आहोत.
बाईट : दिपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री