बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

सबका साथ सबका विकास आता सबके साथ दिवाळी पहाट

जे दुसऱ्याच्या यशाअपशावर सदैव जळत राहतात, ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार - अँड आशिष शेलार

मुंबई, दि. 20 आक्टोबर 2022

जे दुसऱ्याच्या यशाअपशावर सदैव जळत राहतात, ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? असा राजकीय टोला लगावत भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवानंतर आता मुंबई भाजपा तर्फे मुंबईत दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे असल्याचे सांगितले

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुंबईत.होणाऱ्या दिपोत्सवाची माहिती दिली. मुंबई भाजपा तर्फे
रांगोळ्या,गीत, संगीत आणि नृत्य आणि दिव्यांची आरास करुन भाजपा मुंबईकरांच्या दिवाळीत आनंद भरणार आहे.
भाजपातर्फे मुंबईत एकुण 233 हून अधिक ठिकाणी दिपोत्सव, दिवाळी संध्या आणि दिवाळी पहाट हे कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आले आहेत.

जांबोरी मैदानात काल पासून मराठमोळ्या दिपोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर शनिवार, 22 ऑक्टो. 2022 सायंकाळी 6:30 वा. हिंदू फ्रेंड सोसायटी पटांगण, जोगेश्वटी पूर्व, मुंबई आणि
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 8.30 विद्या मंदिर शाळेचे सभागृह, दहिसर, मुंबई येथे दीप संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तर सोमवार, 24 ऑक्टो. 2022,
सकाळी 8 वा. रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पूर्व, मुंबई
सोमवार, 24 ऑक्टो. 2022 सकाळी 6:00 वा.
नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व, मुंबई
मंगळवार, 25 ऑक्टो. 2022,सकाळी 6:00 वा.
राजा बड़े चौक, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई
मंगळवार, 25 ऑक्टो. 2022 सकाळी 6:00 वा.
साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नी रोड, मुंबई
“दिवाळी पहाट प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाय भाजपा कार्यकर्ते स्नेहमिलनशुक्रवार, 21 ऑक्टो. 2022 सायंकाळी 6:30 “ठक्कर्स वॅक्वेट, गिरगाव चौपाटी, मुंबई येथे होणार आहे.

प्रकाशोत्सवात गायक प्रथमेश लघाटे,पंडित उपेंद्र भट
,श्रीकांत नारायण,मुग्धा वैशंपायन, सोनाली कर्णिक, अनिरुद्ध जोशी, अपूर्वा पेंढारकर, राधिका नांदे,रसिका जोशी, दत्तात्रय मेस्त्री,प्रीती निमकर,श्रीरंग भावे,अद्वैता लोणकर आणि राहुल देशपांडे, पुष्कर श्रोत्री यांच्यासारखे मान्यवर कलावंत या उत्सवात सहभागी होणार आहेत.
अभिनेता दिगंबर नाईक, विघ्नेश जोशी,कुणाल रेगे,स्मिता गवाणकर,अमित काकडे,विनायक शिंदे आदी निवेदकांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.
जे सदैव आभास निर्माण करतात की आम्ही म्हणजे मुंबई ते ना कोरोना काळात मुंबईकरांसोबत नव्हते आणि या सण उत्सवात मुंबईकरांसोबत कुठेच दिसत नाहीत, असा टोला ही यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

प्रश्नोत्तरे

वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी रोखठोक उत्तर दिलील. वरळीतील जांबोरी मैदानात भाजप अनेक कार्यक्रम घेत असल्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, वरळीतील जांबोरी मैदानात भाजपाचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं. जे टीका करतायत त्यांना मुंबईकारांशी काही घेणे देणे नाही. विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. वरळीच्या आमदारांनी मराठी साहित्य, संस्कृती, लोककला याबाबत केलेला एक कार्यक्रम दाखवावा. जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे? वरळीत आदित्य ठाकरे आता आलेत. त्यांचा अभ्यास कच्चा आहे. पुर्वी वरळीत दत्तात्रय राणे आमदार होते, हे त्यांना माहीत नसावे.

हा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात मराठी माणूस आणि मुंबईकरांनी केलेला उठाव

उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, हा विषय न्यायालयाचा आहे. मी स्वतः कधीच न्यायालयीन प्रकरणात भाष्य करत नाही. उद्धव ठाकरेंच्या विरोधात न्यायालयात दावा करणारी व्यक्ती ही त्यांची शेजारी आहे, ते मराठी असून मुंबईकर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात शेजाऱ्यानेच न्यायालयात केलेली याचिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात मराठी माणूस आणि मुंबकरांनी केलेले बंड आणि उठाव आहे, असंच मी म्हणेन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button