पोलीसांना बोनस दयावा या मागणीसाठी अश्विनी केंद्रे समाजसेविका यांचे आंदोलन
पोलीसांना बोनस दयावा या मागणीसाठी अश्विनी केंद्रे समाजसेविका यांचे आंदोलन
राज्यशासनाने शासकीय कर्मचारी यांना दीपावली बोनस देण्याचे जाहीर केले.परंतु शासकीय कर्मचारी असूनही सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीदवाक्य उराशी बाळगून सदैव जनतेसाठी दिवसरात्र उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना या दीपावली बोनस पासून थांबवणे म्हणजे हा एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होत आहे. महाराष्ट्र पोलिस राज्यातील अंतरिक सुरक्षितता,कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदैव तत्पर असतात.कोव्हिड 19 संकटात अनेक पोलिसांचे जीवही गेले.तरीही न घाबरता न डगमगता महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते.त्यांनी स्वःच्या जीवाची ,आपल्या परिवाराची काळजी केली नाही.उन,पाऊस,वारा कितीही मोठे संकट आले तरी.महाराष्ट्र पोलीस त्या संकटास तोंड देण्यासाठी,त्या विरोधात लढण्यासाठी सज्ज असतात.सदैव जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना दीपावली बोनस देवून न्याय द्यावा.यासाठी ठाणे शहरातून आंदोलनाची सुरुवात करण्यात येत आहे. अश्विनी केंद्रे समाजसेविका यांनी आंदोलन केले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी पाठिंबा दिला आहे.
BYTE : अश्विनी केंद्रे समाजसेविका
BYTE : धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे