बातम्यामहाराष्ट्र

खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात एम.आय.एम पक्षाच्या महिला आक्रमक…

खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात एम.आय.एम पक्षाच्या महिला आक्रमक...

एमआयएम महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन…

देवपूरसह धुळे शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य सकारकडून मी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला होता, मात्र धुळे लोकसभेचे खा. डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आणि मनपाचे आयुक्त यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वारंवार जावून या निधीवर स्टे आणून धुळ्याच्या विकासाला खिळ घातली आहे. मी धुळ्यातल्याच रस्त्यांसाठी हा निधी मंजूर करुन आणला होता ना, मी पाकिस्तानचे रस्ते बनवण्यासाठी थोडीच निधी आणला होता? असा प्रश्न करीत आ. फारुक शाह यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांवर जोरदार टिका केली आहे.

मागील मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मी हा निधी धुळे शहराच्या विकासासाठी मंजूर करून आणला होता मागील महिन्यात या निधीचा मंजुरी मिळाली होती, मात्र आता धुळ्यातील ह्या महाभागांनी ह्या कामावर आता स्थगिती आणली तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शंभर कोटी रुपये मंजूर केले होते मात्र या शंभर कोटी रुपयांमधून एकही रुपयांचं काम अल्पसंख्यांक प्रभागात या महाभाग यांनी केली नसल्याचा गंभीर आरोप धुळे शहराचे आमदार डॉ फारुख शाह यांनी यावेळी केला.
बाईट: डॉ. फारुख शाह (आमदार, धुळे शहर)

आज एमआयएमच्या महिला आघाडीने रस्त्यावर उतरुन रस्त्यांच्या कामाला खीळ लवणाऱ्यांचा धिक्कार करीत खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रतिमेला जोडो मार आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यानी धुळे लोकसभेचे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या पोस्टरला चपलांचा हार घालून जोडो मारो आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडून धुळे शहराच्या विकासासाठी मिळणाऱ्या 30 कोटी रुपयांचा निधी ला स्टे हा खासदार सुभाष भामरे यांच्यामुळेच लागला असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलनकर्त्या एमआयएम पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपा नाईक यांनी यावेळी केला.
बाईट: दिपा नाईक (महिला जिल्हाध्यक्ष एमआयएम)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button