करमणूकक्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

दुसऱ्या तरुणांबरोबर अफेअर सुरु असल्याच्या संशयावरून प्रियकराने केली हत्या

मुंबई :

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची दुसऱ्या तरुणांबरोबर अफेअर सुरु असल्याच्या संशयावरून प्रियकराने हत्या केली आणि हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला. नंतर सुटकेस रविवारी पहाटेच्या सुमारास कुर्ल्यातील सीएसटी ब्रिजखाली असलेल्या रस्त्यालगतचे मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणी दोन बॅरिकेट्समध्ये टाकून आरोपी फरार झाला होता. मात्र, या सुटकेसमध्ये मृतदेह असल्याची माहिती कुर्ला पोलिसांना रविवारी सकाळी ११.३५ वाजताच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर कुर्ला येथे असलेल्या गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने हत्या करणाऱ्यास ३६ तासात अटकी केली आणि कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे.

मृत महिलेचे नाव प्रतिमा पावल किस्पट्टा (वय- 25 वर्षे) असून आस्कर मनोज बरला (वय २२ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत धारावीत राहत होते. दोघेही मुंबईतील धारावी परिसरात महिनाभर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपीला तरुणीच्या चारित्र्यावर संशय होता. यापूर्वी मृत तरुणी घरकाम करत होती. अलीकडे नोकरी सोडल्यानंतर ती बेरोजगार होती. या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. दोघेही मूळचे ओडिसा राज्यातील रहिवासी आहेत.  नुकतेच ओडिसातून मुंबईत कामासाठी आले होते. शनिवारी रात्री उशिरा ही हत्या करण्यात आली.तो ज्या घरात राहत होता त्याच घरात ही हत्या करण्यात आली होती.

आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक ठिकाणी फिरला, पण अखेर कुर्ल्याच्या एसएलआर रोडवरील मेट्रो स्टेशनजवळील एका दगडी शेडमध्ये मृतदेह टाकला. .या हत्येचे गूढ उकलल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त  राज तिलक रौशन यांनी दिली. एकीकडे पुरी मुंबईपुरी विश्वचषक पाहत होती, तर दुसरीकडे सुटकेसमध्ये  सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ शोधण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे 8 पथक सक्रियपणे तपास करत होते. अवघ्या 36 तासात सुटकेसमध्ये  सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं. मृत महिलेच्या २२ वर्षीय प्रियकराच्या हत्येसह मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे.अस्कर मनोज बरला याला अटक करण्यात आली आहे.

19 नोव्हेंबरला मुंबईतील कुर्ला परिसरात सीएसटी ब्रिजखाली एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह बॅगेत सापडला होता.माहिती मिळताच या मृतदेहाचे गूढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांची सुमारे 8 पथके तात्काळ तैनात करण्यात आली आणि अवघ्या 36 तासात मुंबई पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे महिलेचा खून करणाऱ्याला अटक केली. आरोपी आणि मृत तरुणी  गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत राहत होते आणि ती महिला कोठेतरी घर सांभाळण्याचे काम करत होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने ही नोकरी गमावली होती. आरोपी आणि मृत महिला धारावी परिसरात राहत होती.  दोघांची भेट कोरोनादरम्यान झाली होती, तेव्हापासून दोघेही मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा दाबून हत्या करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.

आरोपी आणि मृत महिला दोघेही मूळ ओडिसाचे रहिवासी असून १८ नोव्हेंबरला  रात्री उशिरा खून केल्यानंतर आरोपी मुंबईत निर्जन स्थळ शोधत होता, अखेर आरोपी आस्कर मनोज बरला हा प्रथम लोकमान्य टिळक ट्रक टर्मिनल रेल्वे स्थानकावर गेला. पण तिथे गाड्यांची गर्दी पाहून आरोपी मृतदेहांनी भरलेली सुटकेस घेऊन तेथून पळून गेला आणि इथून ऑटोरिक्षा घेऊन पळून गेला. सुटकेस कुर्ला परिसरातील मेट्रो कारशेडमध्ये आत ठेवली..परंतु पोलिसांच्या अथक  तपासानंतर मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर अनेक तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला ठाणे रेल्वे स्थानकावरून अटक केली. या हत्येबाबत मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संविधान  कलम ३०२ आणि २०१ अन्वये कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या हत्येची माहिती मृत महिलेच्या कुटुंबीयांनाही दिली आहे.
या हत्येचे गूढ उकलण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तैनात केलेल्या सर्व पथकांना तांत्रिक गोष्टी आणि सीसीटीव्हीची बरीच मदत मिळाली, त्यात कुर्ल्यातील लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजचाही समावेश आहे.जेव्हा आरोपी महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत टाकून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button