जोगेश्वरीत दिवाळीपूर्वी एनजीओ मेळावा उत्साहात संपन्न
जोगेश्वरीत दिवाळीपूर्वी एनजीओ मेळावा उत्साहात संपन्न
नॅब इंडिया, एमएनबी, समर्थ जनाधार प्रतिष्ठान, रुग्ण मित्र, अनिर्वेध चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जोगेश्वरी येथील एमएनबी वास्तुत एनजीओ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. साधारण ५० एनजीओंचा सहभाग होता. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी केले.
तद्प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली माजी नगरसेविका रंजना पाटील, योगीराज दाभाडकर,सिने कलावंत प्राजक्ता परब, नॅबच्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, एमएनबीचे सीईओ मयांक शेखर, समर्थ जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश पोळेकर, रुग्ण मित्रचे विनोद साडविलकर, धनंजय पवार, अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्टच्या स़ंस्थापिका अंजली सरकाळे, सचिन सरकाळे, रमाकांत साटम हे मान्यवर उपस्थित होते.
रुग्ण मित्र प्रविण खेडेकर, रमेश चव्हाण, चारुदत्त पावसकर, हणमंत शिर्के, नागेश गोसावी, वसंत सुतार, वैभव जुवेकर, पंकज नाईक, किरण गिरकर, गणेश सोनवणे, अमिता शर्मा, डाॅ.शीला यादव, डाॅ.अखिलेश यादव, श्रुती गमरे, दिपाली गिजरे, ज्योती धुमाळ, ज्योती जोशी,अरूणा सावंत, दिशा कळंबे, श्रध्दा बनसोडे, श्रध्दा अष्टीवकर, प्राजक्ता इंगळे, अमृता पुरंदरे, पिंकी पाटील, नयना साळवी, संगिता उत्तेकर, भाऊसाहेब मोरे, अब्दुल खलिक, प्रसाद मांडवकर इ.सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. आयोजकांच्या वतीने सहभागी संस्थाना सन्मानपत्र व तुळशी रोपं देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक संस्थाच्या यशस्वी योगदानाबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.