ANC :
दिवाळी आता आठवड्याभरावर येऊन ठेपलेली आहे. सध्या नागरिकांची दिवाळीच्या खरेदीसाठी एकच लगभग सुरू झाली आहे. दीपावलीची शोभा वाढते ती म्हणजे घरावर लावलेल्या कंदिलामुळेच. आता बाजारात मोठ्या प्रमाणात आणि विविध आकारांचे आणि पद्धतीचे कंदील उपलब्ध झाले आहे. ठाण्यातील घंटाळी येथे असेच कंदील चे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ग्राहकांच्या विविध आवडीनिवडी नुसार या ठिकाणी कंदील उपलब्ध करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखराच्या आकृतीचे कंदिलांची मागणी वाढली आहे. यावेळी बाजारात पारंपरिक कंदील, लाकडी कंदील तसेच इको फ्रेंडली कंदील उपलब्ध आहेत. सध्या बाजारात 15 रुपयांपासून ते 5 हजार रुपये किमतीचा पर्यंतचे सार्वजनिक कंदील देखील उपलब्ध आहेत. यासाठी 50 ते 60 तरुण तरुणी हे कंदील तयार करत आहेत. या तरुणांमध्ये 20 ते 25 मुखबादिर मुलांचा समावेश आहे. सध्या बेरोजगारी वाढलेली आहे. या तरुणांना रोजगार मिळावा या दिवाळीच्या निमित्ताने या तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.
या कंदीलांसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे कंदील व्यावसायिक स्वप्नील जाधव यांनी सांगितले.
BYTE : स्वप्नील जाधव ( कंदील विक्रेते)