ANC –
वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघत असल्याने विद्यार्थी त्रस्त झालेय. रात्रीत जेवणात अळ्या निघाल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यामुळे विद्यर्थ्यांनी मध्यरात्री वासतिगृहाताच आंदोलन करीत कारवाईची मागणी केलीय. दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सतत होत असल्याने विद्यार्थी संतापलेय.
रात्रीच्या जेवणात देखील अळ्या निघाल्या. तब्बल तेरा विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. प्रकृती अस्वस्थ झाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहाताच आंदोलन सुरू केले. रात्री 9 वाजतापासून सुरू झालेले आंदोलन रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होते. प्रकृती अस्वस्थ झालेल्यामध्ये पाच मुली आणि आठ मुलांचा समावेश आहेय. भारत माता की जय च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मेसच्या जेवणाचे पैसे घेऊन देखील योग्य भोजन मिळत नसल्याचे विद्यार्थी सांगताहेत.
अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि तोडगा काढला असल्याचे सांगितले जात आहे.
BYTE – विद्यार्थी