बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending
कल्याण – महापालिका कामगारांना मिळणार 16 हजार 500 रुपये दिवाळी बोनस
कल्याण - महापालिका कामगारांना मिळणार 16 हजार 500 रुपये दिवाळी बोनस
कल्याण डोंबिवली महापालिका कामगारांना 16 हजार 500 रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. ही घोषणा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे मागच्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस दिला गेला होता. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदा 16 हजार 500 रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. बोनसची रक्कम येत्या बुधवार्पयत कामगारांच्या खात्यात जमा होईल असे आयुक्तांनी सांगितले. रेग्यूलर, ठोकपगारी, कंत्राटी, परिवहन आणि शिक्षण खात्यातील कामगारांना हा बोनस दिला जाणार आहे. केवळ वर्ग एक आणि दोनच्या अधिकार्याना बोनस दिला जाणार नाही हे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बोनस जाहिर होताच कामगारांनी आनंद व्यक्त करीत एकमेकांना पेढे भरविले.
BYTE – डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, केडीएमसी.