मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची पत्रकार परिषद
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची पत्रकार परिषद
मनसे युवा नेते अमित ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी रात्री संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी व स्पर्धा परीक्षेचा फार मोठा मुद्दा आहे हा मुद्दा जर पेटला तर महाराष्ट्रभर पेटतो मला मुंबईमध्ये राहून मला कळते की असा स्पर्धा परीक्षेचा मुद्दा पेटला आहे आपण याच्यावर काहीतरी आंदोलन घेतलं पाहिजे किंवा मुद्दा घेतला पाहिजे. प्रत्येक कॉलेजचे जे वैयक्तिक विषय असतात जालना परभणी हिंगोली संभाजीनगर धाराशिव यांच्या सर्वांचे विषय वेगळे असतात हे मला मुंबईला राहून कळत नाही यासाठी मी हा युनिट स्थापनेचा कार्यक्रम घेत आहे बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षेवर आमचं काम सुद्धा चालू आहे. सध्या विद्यार्थ्यांना घेऊन ही निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या मनातील राग जर बाहेर आला तर त्याला फुंकर कोण देणार या विषयाला ते म्हणाले की राज साहेब आणि मी याला फुंकर देऊ शकतो.