पैठणी करता लागणाऱ्या रेशीमच्या किंमतीत वाढ
पैठणी करता लागणाऱ्या रेशीमच्या किंमतीत वाढ
येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणी करता लागणारे रेशीमच्या किंमतीत हजार रुपयांनी वाढ झाली असून याचा फटका नक्कीच पैठणी विणकारांना बसणारा आहे. पैठणी करता लागणारा कच्चामाल रेशीम हा बेंगलोर येथून येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तुतीचे पीक हे खराब झाल्यामुळे रेशीमच्या किमतीत वाढ झाली आहे.येवल्यातील पैठणी घेण्यासाठी भारतातून नव्हे तर जगातून लोक येवला शहरात येत असतात. मात्र या पैठणी करता लागणारा जो कच्चा माल रेशीम महाग झाल्याने पैठणी कारागरांना याचा फटका बसणार आहे. रेशीम ज्या ठिकाणी तयार होतं त्या बेंगलोर मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तुतीचे पीक हे पूर्णपणे खराब झाल्याने रेशीमचे उत्पादनात देखील कमी प्रमाणात झाल्यामुळे रेशीमच्या दरांमध्ये हजार ते बाराशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पैठणी विणकारांना पहिले पाच हजार रुपयांना मिळणारे रेशीम हे आता सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये घेण्याची वेळच असल्याने नक्कीच याचा फटका पैठणी विणकारांना बसणार आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर रेशीम चे भाव वाढल्याने मोठा फटका रेशीम कारागिरांना बसणार आहे.