बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महिला व बालविकास विभागाच्या तत्परतेने मतिमंद मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा फेसबुकवरील तक्रारीची तत्काळ दखल

महिला व बालविकास विभागाच्या तत्परतेने मतिमंद मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा फेसबुकवरील तक्रारीची तत्काळ दखल

मुंबई,

महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ मतिमंद मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली आहे.
दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय मतिमंद मुलगी रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला. तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाच्या समाज माध्यम प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. श्रीमती अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर. विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या निवासाची व्यवस्था केली.
प्रतिक्रिया 1
महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या समाज माध्यम टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
– राहुल जाधव, पुणे.
प्रतिक्रिया 2
एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.
– रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button