बातम्यामहाराष्ट्र
Trending

समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागली आग

समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागली आग

समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील नवीन बांधकाम सुरु असलेल्या भागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली घटना 12 आक्टोबर रात्री 10 सुमारास घटना घडली.
रात्रीच्या लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी आणि नागरिकांना ही आग दिसताच प्राथमिक अग्नी शामक सिलेंडरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. रुग्णालयात आग लागल्याची माहिती होताच रुग्णामध्ये एकच गोंधळ उडाला सर्व रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडले त्या वेळेस 20 ते 25 रुग्ण रुग्णालयात भरती होते.या आगीत विशेष काहीही नुकसान झाले नसलेतरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला. कुठलेही जीवित किंवा आर्थिक नुकसान झाली नाही. आगीची लागण्याची माहिती होताच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली आग विजविन्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.काही वेळासाठी समुद्रपूर येथील विज पुरवठा बंद करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button