मनसेचा जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा; शेअर मार्केटच्या नावाने गंडा घालणाऱ्या संचालकांना ‘मोक्का’ लावण्याची मागणी
मनसेचा जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा; शेअर मार्केटच्या नावाने गंडा घालणाऱ्या संचालकांना 'मोक्का' लावण्याची मागणी
सांगली – शेअर मार्केट बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना हजारो कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत नाहीत. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष करत बोगस कंपनीच्या संचालकांना पाठीशी घातले आहे. सामान्य लोकांना गंडा घालणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, या घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी आज मनसेच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सांगली जिल्ह्यात गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या बोगस कंपन्यांचे पेव फुटले आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा चुना यांनी लावला आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. या प्रकरणात कंपन्यांच्या काही संचालकांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, यात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो गुंतवणूकदार सहभागी झाले होते. दोषी संचालकांवर मोक्का अंतर्गत कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
BYTE : मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत