गोलाणी मार्केटजवळ हायप्रोफाईल कुंटनखान्यावर छापा, ६ तरुणी, महिलांसह ३ पुरुष ताब्यात
गोलाणी मार्केटजवळ हायप्रोफाईल कुंटनखान्यावर छापा, ६ तरुणी, महिलांसह ३ पुरुष ताब्यात
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल कुंटन खान्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी छापा टाकला आहे. गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरात अवैध कुंटनखाने अनेक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असून पोलीस दादा सोपस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या एका खोलीत कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असताना अद्याप पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही. कुंटनखान्यामागे कुणी राजकीय पदाधिकाऱ्याचा हात तर नाही? अशी शंका उपस्थित होत आहे.