सांताक्रुझ पूर्व कालीना येथे बहुविकलांगांसाठी कार्यरत सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनाचे औचित्य साधून मनोरंजनाच्या ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये मालाड येथील जीएलआर सेरेब्रल पाल्सी युनिट, घाटकोपर येथील गुरुकुल सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन्स, वांद्रे येथील अडप, चेंबूर येथील लिटील हार्ट लर्निग सेंटर, कालीना येथील सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया आणि कुर्ला येथील एस.जी.बर्वे मार्ग महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष शाळेतील शिक्षकांनी सरावाव्दारे स्पर्धकांकडून मेहनत करून घेतली होती.विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह देण्यात आले.
या कार्यक्रमात सीए अजित कुचेरीया, आलोक मिश्रा, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, सुनिता गुप्ता, संदीप अग्रवाल, राजेंद्र पुरोहित, मंजुषा सिंह, विनोद साडविलकर, सिंथिया मेथ्यू, सुजाता सावंत, प्रिती चौधरी, ज्योतीका भाटीया, राकेश अग्रवाल, राजू गोल्लार, हेमांगी पिसाट हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्या विरंधानी यांनी केले.