आज जगात महात्मा गांधी यांच्या ‘ नई तालीम ‘ या शिक्षण प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे – अनिल गलगली
आज जगात महात्मा गांधी यांच्या ' नई तालीम ' या शिक्षण प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे - अनिल गलगली
बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या निर्मिताने संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना आणि परिसरात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळयास विशेष अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार अनिल गलगली होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनिल गलगली यांनी सांगितले की महात्मा गांधी यांची ओळख जरी अहिंसा आणि सत्याग्रहासाठी असली तरी शिक्षण नेहमीच त्यांचा सर्वात आवडीचा विषय होते. आज जगात महात्मा गांधी यांच्या ‘ नई तालीम ‘ या शिक्षण प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे. तर प्रमुख वक्ते डॉ. कृष्णा नाईक यांनी उपस्थितांना संबोधन करताना महात्मा गांधीजी हे आचार होते तर लाल बहादूर शास्त्री हे त्यांचाच विचार होते. असे सांगतांना म. गांधीजीनी केलेले शैक्षणिक कार्य, तत्त्वज्ञान लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षण तज्ञ भालचंद्र दळवी म्हणाले की अश्या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन समाज घडविला जातो तर पत्रकार शिवाजी गावडे यांनी संस्थेच्या व गणेश मूर्तीस मिळालेल्या प्रथम पारितोषकाबद्दल संस्थेचे कौतुक केले. यावेळी धनजी बागडवाला, राजेंद्र पवार, वैभव आवटे पाटील, हरिश्चंद्र पाठक, प्रभाकर विचारे, प्रतिक चव्हाण, सुरेश साखरे उपस्थित होते.
सोहळयाचे सूत्रसंचालन करतांना संस्थेचे अध्यक्ष बाळा चव्हाण यांनी संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची माहिती दिली.