बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये मिळणार रोजगाराचा संधी

केंद्राच्या साहाय्याने बॅंकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच

केंद्र सरकार आणि एआयसीटीई,एनएसडीसी आणि बजाज फ़िन्सर्व यांच्यात भागीदारी

मुंबई

 

केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फ़िन्सर्व यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारामार्फत पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासंबंधी घोषणा नुकताच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली असून या करारांतर्गत महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आर्थिक सेवा क्षेत्रामधील रोजगार संधींकरिता तरूण पदवीधर मुलं बॅकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्स सर्टिफ़िकेट प्रोग्राम अंतर्गत तयार होतील, या भागीदारीमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये क्षमता निर्मीतीसह तरूणांना आर्थिक क्षेत्रातील डिजिटल माध्यमांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये सहभागी होण्याकरता भक्कम पद्धतीने तयार केले जाणार आहे.

याबाबत बजाज फ़िन्सर्व लिमिटेडचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक, संजीव बजाज म्हणाले कि, “ आमची एनएसडीसी आणि शिक्षण मंत्रालयाशी झालेली भागीदारी ही आम्हाला तरूण वर्गामध्ये बदल घडवून आणण्यात मदत करेल ज्याकरिता त्यांना उत्तम कौशल्यासह अगिणित असे यशाचे दरवाजे देखील खुले होतील. यामुळे आर्थिक लवचिकतेस एकत्रित कामाचा संधी भविष्यात उपलब्ध होतील, आणि कौशल भारत, कुशल भारत हे वाक्य खरे करून दाखविले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button