महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याचे मॉरिशस मध्ये अनावरण
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याचे मॉरिशस मध्ये अनावरण
—————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
—————
भारतीय संविधान विश्वात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही भारतात नांदत आहे.जाती धर्म भाषा प्रांत विविधतेने भारत नटला असून विविधता असून भारताची एकता आणि अखंडता आज मजबूत उभी आहे ती केवळ भारतीय संविधनानामुळे. संविधानाचे जनक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर असून संपूर्ण जगाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता स्वातंत्र्य विश्वबंधुता आणि न्यायाच्या विचारांची जगाला गरज आहे. त्यामुळे मॉरिशस मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मॉरिशस सरकार जमीन द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.मॉरिशस मधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट च्या प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मॉरिशस मधील पहिल्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ना.रामदास आठवले बोलत होते.
भारतीय संविधानातील मूल्ये ही सर्व जगाला प्रेरणा देणारी आहेत. संविधानाने दिलेल्या समता बंधुता या तत्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीने काम करीत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार भारत सरकार ची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी ना.रामदास आठवले म्हणाले. यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सोशल वर्क अवॉर्ड पुण्याचे माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे;प्रसन्न देशमुख;संतोष बारणे ;सुवर्णा पवार;सुरेश गोरेगावकर आदींना मॉरिशस चे राष्ट्रपती महामहिम पृथ्वीराजसिंग रूपन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.