महाराष्ट्रमुंबई

भांडुप पश्चिम क्वारी रोड येथील जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तत्काळ मंजुर करावा

भांडुप पश्चिम क्वारी रोड येथील जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तत्काळ मंजुर करावा

———————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
——————————-
भांडुप पश्चिम क्वारी रोड येथील जलवाहिनी वारंवार फुटल्याने होणारी जलगळती लक्षात घेता सदर जलवाहिनी बदलण्याचा रेंगाळलेला प्रस्ताव तत्काळ मंजुर करत नागरिकांना न्याय देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

अनिल गलगली यांनी आयुक्त सहित जल अभियंता यांस पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मागील 12 दिवसांत जलवाहिनी फुटल्याने घाटकोपर, भांडुप, कांजूर आणि विक्रोळी भागात पाणीपुरवठा झालेला नाही. सहाय्यक अभियंता जलकामे ( बांधकाम) यांच्या मार्फत काम प्रगतीपथावर असून त्याकरिता पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. 900 MM GRP जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून रेंगाळला असून याबाबत आता निर्णय घेण्याची आवश्कता असल्याचे नमूद करत गलगली म्हणतात की वारंवार गळतीमुळे नागरीकांना त्रास तर सहन करावा लागतो आणि पालिकेचे नुकसान ही होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button