डोंबिवलीत रेल्वेची सरक्षण भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू तर तीन कामगार जखमी एकाचा शोध सुरु
डोंबिवलीत रेल्वेची सरक्षण भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू तर तीन कामगार जखमी एकाचा शोध सुरु
विजय कुमार यादव
ठाणे महाराष्ट्र दिनांक 21 डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात असलेल्या रेल्वेच्या सब स्टेशन जवळील सरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. याच दरम्यान अचानक ही भिंत कोसळल्याने या ढिगाऱ्याखाली ५ कामगार गाडले गेल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी ४ वाजल्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान यातील दोन कामगाराचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरु असल्याचे डॉक्टराणी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टीत असलेले रेल्वेचे स
ब स्टेशन बंद असून हे स्टेशन तोडून तसेच या परिसरातील झोपडपट्टी वर कारवाई करत रेल्वे रूळ रुंदीकरण सुरु केले जाणार होते. रेल्वेकडून मागील काही दिवसापासून सरक्षण भीतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. यासाठी काही मजूर काम करत होते आज द्पारच्या सुमारास हे मजूर या भीतीचे काम करत असताना अचानक हि भिंत कोसळल्याने याखाली ५ मजूर गाडले होते. मल्लेश चव्हाण (35), आणि बंडू कोवासे (50) य दोघांचा मृत्यू झाला असून माणिक ओवर (62) ,विनायक चौधरी (35) , युवराज वेडगुत्तलवार (35) अशी जखमीची नावे असून यातील मल्लेश चौहान व बंडू कोवासे या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.
नागरिक 1 ,2
सुनील कुराडे (सहायक पुलिस आयुक्त डोंबिवली )