मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा बंजारा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी डॉ. शंकर पवारांचा पुढाकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा बंजारा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी डॉ. शंकर पवारांचा पुढाकार
ठाणे (प्रतिनिधी ) : देशातील विविध भागातून ठाणे आणि मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या बंजारा समाजाचे प्रश्न आणि त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील ढोकाळी भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य सत्कार कार्यक्रम १६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये राज्यभरातील हजारोच्या संख्येने बंजारा समाज या मेळावामध्ये येणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यासंदर्भातील आढावा बैठक ठाणे येथे संपन्न झाली.
ठाण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोबत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, गुलबर्गा लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. उमेश जाधव उपस्थित राहणार आहेत आणि यांचे सर्वांचे भव्य सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून समस्त बंजारा समाजाच्या काही प्रमुख मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडणार असल्याचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर पवार यांनी म्हणाले.