रामदास कदम यांनी केलेल्या गलिच्छ आणि अशलाघ्य वक्तव्याचा समाचार घेण्याबाबत…
रामदास कदम यांनी केलेल्या गलिच्छ आणि अशलाघ्य वक्तव्याचा समाचार घेण्याबाबत...
मुम्बई दिनांक 20 सितंबर राजकारणात वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप होत राहतात प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी विविध प्रकारचे युक्तिवादही करतो परंतु संसदीय राजकारणाची पातळी खालावली आहे आणि काही लोकांनी तर जणू यासाठीची सुपारीच घेतली आहे.
आरोप प्रत्यारोप करताना किंवा वादविवाद करताना ते मुद्द्यांवर असावे ते ध्येय धोरणावर असावेत नवे ते तसेच आजपर्यंत होत होते परंतु कौटुंबिक पातळीवर घसरणे गलिच्छ पातळीवर येऊन बोलणे हा काही लोकांचा धंदा झाला आहे.
ज्या रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली आणि विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली.
त्या रामदास कदम यांनी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं.. ही हिम्मत दाखवणं. ही विकृती आहे हा सत्तेचा माज आहे.
रामदास कदम सारखा माणूस शिवरायांचा मावळा किंवा शिवसैनिक तर दूरच परंतु तो कुणाचाही मुलगा किंवा भाऊ म्हणून घेण्याच्या ही लायकीचा असू शकत नाही.
अशा माणसाला शिवसेना राज्यात फिरू देणार नाही.