महाराष्ट्रमुंबई
Trending

स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प सर्वांपर्यंत पोहचवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प सर्वांपर्यंत पोहचवा - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

————————-
श्रीश उपाध्याय/मुंबई
—————————

“स्वच्छ समुद्र-सुरक्षित समुद्र” अभियानात दोन ते तीन हजार युवक सहभागी होत आहेत. या युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प करावा, हा संकल्प सर्वांपर्यंत पोहोचवावा,युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षितेसाठी उचललेले पाऊल अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने मुंबईत पाच जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या 75 दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ अभियानातंर्गत आज सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने गिरगांव चौपाटी येथे आयोजित विशेष स्वच्छता कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अनंत सिंघानिया, समीर सोमय्या, अजित मांगरुलकर, रवींद्र सांगवी, भारतीय तटरक्षक दलातील वरिष्ठ आधिकारी यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थ्यी उपस्थित होते.
श्री.चव्हाण म्हणाले, राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्राच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे जबाबदारी नागरिकांची आहे, कोळी बांधवांशी समन्वय ठेऊन स्वच्छता आणि सुरक्षिततेवर लक्ष देणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन श्री.चव्हाण म्हणाले, राज्यात आजपासून 2 ऑक्टोबर पर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून लोकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2014 पासून देशात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागरणाचा प्रयत्न केला आहे.
केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत देशभारातील 75 समुद्र किनाऱ्यावर 75 दिवसांची अभियान राबविण्यात आली. मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-अक्सा, गोराई-मनोरी किनाऱ्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्थांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, गुणवंत कर्मचारी-संस्था यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button