भारतमहाराष्ट्रमुंबई
Trending

महाराष्ट्र चेंबरतर्फे 15 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय उद्योग परिषदेचे आयोजन

महाराष्ट्र चेंबरतर्फे 15 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय उद्योग परिषदेचे आयोजन

——————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
—————————-

परिषदेत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे, महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत व पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर या महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राच्या शतक महोत्सवी शिखर संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उद्योग परिषदेचे आयोजन गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत तळमजला साउथ लॉन्स, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आणि मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये मुख्य पाहुणे भारत सरकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नाम. श्री. नारायण राणे व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री नाम. श्री. उदय सामंत हे भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम क्षेत्राची प्रगती – भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आणि मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यस्तरीय परिषदेत युवा सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची भूमिका आणि राष्ट्र निर्माण या विषयावर महाराष्ट्र सरकारचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री नाम. श्री. मंगलप्रभात लोढा हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय परिषदेमध्ये राज्यातील व्यापार, उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन होणार असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी असलेल्या योजनांची माहिती मिळणार असून ही राज्यस्तरीय परिषद राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. तसेच व्यापारी उद्योजकांनी मोठ्या संख्येने राज्यस्तरीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर ,उपाध्यक्ष तनसुख झांबड, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर व कार्यकारीणी समितीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button