येरवडा कारागृहातील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येरवडा कारागृहातील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विजयकुमार यादव
*मुंबई:
एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची येरवडा कारागृहात प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याप्रकरणी शर्मा यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.सुरक्षेच्या कारणास्तव प्रदीप शर्माला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. तुरुंगात पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेले असता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शर्मा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी अंबानींच्या निवासस्थानी स्फोटकं सापडल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर व्यापारी मनसुख हिरेंचाही खून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. शर्मा यांनी मागील विधानसभा निवडणूकही नालासोपारा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून लढवली होती.