ठाण्यात रस्त्यांवरील खड्डे जीवावर बेतले . . .मनसे आक्रमक कोट्यवधी रूपये खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा झाल्याने मनसे कडुन पालिका अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट
ठाण्यात रस्त्यांवरील खड्डे जीवावर बेतले . . .मनसे आक्रमक कोट्यवधी रूपये खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा झाल्याने मनसे कडुन पालिका अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट
ठाणे,
स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या ठाणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.तर गेल्या सहा वर्षात रस्त्यांवर केला गेलेला १३०० कोटींचा खर्च असो किंवा गेल्या दोन महिन्यांपासून १८३ कोटींच्या रखडलेल्या कामामुळे रविवारी कोपरी पुल परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे ठाण्यातील अनेकांचा जीव जाऊनही प्रशासन मात्र कुंभकर्णासारखे झोपी गेलेले आहे. ठाणेकरांना सहन कराव्या लागणाऱ्या या त्रास विरोधात सोमवारी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपाच्या नगर अभियतांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट देऊन अनोखे आंदेालन करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या वतीने ठाण्यातील खराब रस्त्यांबाबत आवाज उठविला जात आहे. वारंवार निवेदन देऊनही ठामपा प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. रविवारी २७ वर्षाच्या तरूणाचा कोपरी येथे झालेल्या अपघातात खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. तेव्हा अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे ? असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने ठाणे महापालिकेला केला जात आहे. एकीकडे स्मार्ट सिटीसाठी पुरस्कार मिळत असताना मात्र दुसरीकडे ठाण्यातील खराब रस्त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. याचा जाब विचारून महाराष्ट्र सैनिकानी सोमवारी प्रशासनाचा निषेध केला. तसेच नगर अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट देत आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी, मनसेचे जनहित कक्ष शहर अध्यक्ष स्वप्नील महिन्द्रकर , महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे , विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, पप्पु कदम , आशिष डोके, रश्मी सावंत ,संजय भुजबळ, प्रशांत पालांडे, राजेंद्र कांबळे, राजश्री वारेकर , सोना कुबल आदी महाराष्ट्र सैनिक उपस्तित होते.
चौकट – १८३ कोटीचा निधी; तरीही रस्त्याची कामे रखडलेली
ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि युटीडब्लुटी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. मात्र, केवळ कागदी घोडेच नाचवण्यात आले असुन ठाण्यातील १२७ रस्त्याची कामे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेली आहेत.
चौकट – रस्त्यांवर ६ वर्षात १३०० कोटीची उधळपट्टी
गेल्या सहा वर्षांमध्ये ठाणे महापालिकेने रस्त्यांवर १ हजार ३२१ कोटी रूपये खर्च केला आहे. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर अमाप खर्च होत असतानाही दरवर्षी f पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांचा बळी जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज ठाणेकर आपला जीव गमवत आहेत.