सर्व खासगी आस्थापनांना राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
सर्व खासगी आस्थापनांना राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
——————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
——————————
शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येईल. तसेच सर्व खासगी आस्थापनाना त्यांची मनुष्यबळ मागणी राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग व कामगार विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत पुढील कर्यवाही केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.
शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी माहिती देताना श्री. लोढा बोलत होते.
कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत कंपनीने रजि