महाराष्ट्रमुंबई
Trending

मानधन वेळेत देण्यासाठी यंत्रणा विकसित करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मानधन वेळेत देण्यासाठी यंत्रणा विकसित करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

—————————-
श्रीश उपाध्याय/मुंबई दि. 22:08:2022
————————————
संजय गांधी निराधार योजनेतून मानधन वेळेत देण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना मानधन देण्यात येते. पण कधी काही तांत्रिक अडचणींमुळे मानधन वेळेत देण्यात अडचणी येतात. पण या अडचणींवर मार्ग काढून मानधन वेळेत दिले जाण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल.
सामाजिक न्याय मंत्री संजय राठोड यांनी या योजनेतून दिले जाणारे मानधन वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असून ज्येष्ठ नागरिकांचे वयोमर्यादा 65 वरुन 60 वर्षं करण्यासाठी तातडीने बैठक घेऊ, असे सांगितले.
या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य सुनील कांबळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button