पोषणयुक्त तांदळाचेच विद्यार्थ्यांना वाटप – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
पोषणयुक्त तांदळाचेच विद्यार्थ्यांना वाटप - अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
——————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
——————————
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील टेंभी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि नवभारत प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये पोषणयुक्त तांदळाचेच वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ आढळून आल्यासंदर्भात विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री.राठोड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आहारात पोषणयुक्त तांदूळ असावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषणयुक्त तांदळाचे वाटप राज्यात करण्यात येत आहे. या तांदळाबाबत चर्चा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे आणि या तांदळाबाबत आता कोठेही गैरसमज नाही, अशी माहिती मंत्री.श्री.राठोड यांनी विधानसभेत दिली.