बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबई
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची निवृत्ती
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची निवृत्ती
संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द पुढीलप्रमाणे :
- आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण
- 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी
- सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात
- मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले
- 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना
- 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे
- मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला
- 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.
- 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला
- 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.
- 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
- 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते
- 2001 मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.
- 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.
- कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.
-
- 2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.
- 2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.
- अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.
- 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.