बोरीवली पश्चिम येथील जनरल करीयप्पा पुलापासून थेट शिंपोलीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलास C.D.S. प्रमुख “जनरल बिपीन रावत उड्डाणपूल” नाव द्यावे अशी मागणी – खासदार गोपाळ शेट्टी
बोरीवली पश्चिम येथील जनरल करीयप्पा पुलापासून थेट शिंपोलीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलास C.D.S. प्रमुख "जनरल बिपीन रावत उड्डाणपूल" नाव द्यावे अशी मागणी - खासदार गोपाळ शेट्टी
बोरीवली पश्चिम येथील जनरल करीयप्पा पुलापासून थेट शिंपोलीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलास C.D.S. प्रमुख “जनरल बिपीन रावत उड्डाणपूल” नाव द्यावे अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे. या उड्डाणपुलामुळे बोरिवलीतील नागरिकांची स्वामी विवेकानंद मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या उड्डाण पुलाच्या कामासाठी प्रथमतः शिफारस आणि सातत्याने पाठपुरावा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेला आहे. आता या पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे. येणाऱ्या पावसाळ्यात या उड्डाणपुलामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. या उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथींसोबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे अशी आग्रही मागणी देखील खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे. याच मागणीचे पत्र घेऊन बोरीवली व कांदिवली विभागातील सर्व नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांची भेट घेतली. व या भेटीवेळी हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा व या उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथींसोबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे अशी आग्रही मागणी देखील केली आहे.