बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

ना भाडे ना वीज वापर वसूली !

पालिका मुख्यालयातील राजकीय पक्षावर प्रशासन होते मेहरबान

मुंबई

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही सर्व राजकीय पक्षाने कोणतीही परवानगी घेतली नाही ना भाडे अदा करण्याची तसदी घेतली ना वीज आकार अदा केला. संपूर्ण मुख्यालयात एकच मीटर असल्याचा दावा करत पालिकेने परवानगी भाडे वसुलीची माहिती अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा अजब दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरात केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे राजकीय पक्षास दिलेली परवानगी, आकारलेले भाडे आणि वीज आकाराची माहिती विचारली होती. मुख्यालयातील कार्यकारी अभियंता कार्यालयाने अनिल गलगली यांस स्पष्ट केले की मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाही 28 डिसेंबर 2022 पर्यंत पालिका मुख्यालयात असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यालयात कामकाज सुरु होते त्याच्या मंजुरीची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही. यासाठी आकारलेल्या भाड्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही. तर यांत्रिकी व विद्युत विभागाने कळविले की महापालिका मुख्यालयाकरिताच्या जुन्या इमारतीकरिता एकच विद्युत मीटर असून नगरसेवक कार्यालयाकरिता वेगळा विद्युत मीटर देण्यात आलेला नाही. यामुळे पालिका मुख्यालयाकरिता राजकीय पक्षांकरिता वापरण्यात येणाऱ्या वीजबिलाची रक्कम वेगळी देणे शक्य नाही.

अनिल गलगली यांच्या मते कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नियमाप्रमाणे सर्व राजकीय पक्षाची कार्यालये बंद करणे आवश्यक असतानाही पालिका प्रशासनाने उदारता बाळगली. ज्या अधिकारी वर्गांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करत कार्यालय आणि वीज वापर झाला असून त्याची वसूली त्या त्या राजकीय पक्षाकडून करण्यात यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button