ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी ऑस्ट्रियाचे भारतातील व्यापार आयुक्त हांस हार्टनेजल, ऑस्ट्रियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मौलिक जसुभाई व सल्लागार रुस्तम वकील देखील उपस्थित होते.