अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा – भाजप पदाधिकारी यांची मागणी
अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा - भाजप पदाधिकारी यांची मागणी
भारतीय जनता पार्टी दिघा तालुक्याच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिपाली भोसले सय्यद या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे लेखी निवेदन व ऑनलाइन तक्रार देण्यात आली आहे.
सदर तक्रारी मध्ये भाजपा पदाधिकारी यांचे असे म्हणणे आहे की अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांनी भारताचे पंतप्रधान व जागतिक दर्जाचे नेते मा.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या बद्दल बदनामी करण्याच्या उद्देशाने व त्यांची प्रतिमा कलंकित करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पोस्ट करत मा.मोदी साहेबांन बद्दल अपशब्द वापरत त्यांना बदनाम करण्याचे काम केले आहे.
तसेच भारताचे सर्वात मोठे पद असलेल्या पंतप्रधान या पदाचा अपमान देखील दिपाली भोसले सय्यद नामक अभिनेत्रीने व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे.तसेच भारतीय नागरीक म्हणून असे वाटते की सदर महिलेनी मा.मोदी साहेबांचा अपमान केलेला नसून.त्यांच्याकडे असलेल्या पंतप्रधान या संवैधानिक पदाचा तसेच संपूर्ण भारत देशाचा अपमान या महिलेने केला आहे.
तसेच दिपाली भोसले सय्यद यांनी भारताचे पंतप्रधान यांना लुच्छा असे संबोधून त्यांचा व संपूर्ण भारत देशाचा अपमान केला आहे.तसेच सोशल मीडिया वर व्हिडिओ टाकून मा.मोदी साहेबांची बदनामी व प्रतिमा कलंकित केली आहे म्हणून दिपाली भोसले सय्यद नामक अभिनेत्रीवर भारतीय दंड संहिता कलम १५३(अ),५००,५०१,५०४ प्रमाणे गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.