चॉपरचा धाक दाखवून एक लाखाहून अधिक रकमेची लुट, कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ! श्री मलंग रोड वरील लुटीचा नवीन प्रकार !
चॉपरचा धाक दाखवून एक लाखाहून अधिक रकमेची लुट, कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ! श्री मलंग रोड वरील लुटीचा नवीन प्रकार
कल्याण – कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीत शस्त्राचा धाक दाखवून लुटीच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असल्याचे दिसत असतांनाच अशाच एका प्रकारात आपल्या चार चाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांना या वाहन चालकाला चॉपरचा धाक दाखवून सुमारे एक लाखाहून अधिक रकमेची लुट केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ८ . ३० चे सुमारास श्रीमलंड रोडवर घडली असून या प्रकारामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे .
सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार कल्याण पश्चिमेतील होली कॉस शाळे जवळील रिजन्सी टॉवर मध्ये रहाणारे जगदीश भास्कर पवार ( ४५ ) हे आपल्या मारूती इंडीका गाडीने श्रीमलंग रोड वरील नांदीवली येथील बस स्टॉप जवळ आले असता आरोपी प्रथमेश वांगुर्ले व त्याच्या अन्य एका साथीदाराने जगदीश पवार यांची गाडी थांबवून आरोपींनी जबरदस्तीने गाडीत प्रवेश केला व गाडी श्रीमलंग रोड वरील ढोके गावाकडे नेऊन अचानक पणे जगदीश यांना मारहाण करण्यास सुरुवात करत त्यांच्या पवार यांच्या कमरेला चॉपर लावून त्यांचे मोबाईल काढून घेतला व जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांच्या पवार यांच्या मोबाईल मधुन गुगल पे व फोन पे अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात असलेली रक्कम आरोपीचा मित्र विश्वकर्मा याचे खात्यात ट्रान्सफर करून घेतली तसेच पवार यांच्या पाकीटात असलेली रोख रक्कम आणि गळ्यातील अंदाचे रुपये ४० ० ०० किमतीची सोन्याची चैन असा एकूण १ लाख ३ हजार ७०० रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल आरोपींनी पवार यांचे कडून चॉपरचा धाक दाखवून जबरी काढून घेतला .