क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १ कडून धडक कारवाई. APMC येथे घरफोडी करणाऱ्या ४ आरोपींना केले गजाआड.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १ कडून धडक कारवाई. APMC येथे घरफोडी करणाऱ्या ४ आरोपींना केले गजाआड.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर १८,वाशी, नवी मुंबई
येथील एका कुरियर कंपनीमध्ये दिनांक ३१/०३/२०२२ रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी
कंपनीच्या दरवाज्याची बनावट चावी बनवून, आतमध्ये प्रवेश करुन १,४०,४०,०००/- रोख रक्कम
घरफोडी चोरी करून नेली होती. तसेच आरोपींचा शोध घेता येवू नये, म्हणून कंपनीतील cctv
Camera चे DVR मशीन देखील काढून नेले होते. सदर बाबत एपीएमसी पोलीस ठाणे येथे
गु.र.नं. १०९/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.