बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची समन्वय बैठक संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींची बैठकीला उपस्थिती

येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरीय कामे सुरू आहेत. या सर्व कामांची नियमितपणे पाहणी करावी, तसेच आपापल्या क्षेत्रात असलेल्या विविध यंत्रणांशी सुसमन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्या आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पावसाळापूर्व समन्वय बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या.

..
मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती आश्विनी भिडे आणि मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात आज झालेल्या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, महानगरपालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

..
या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई उपनगर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या क्षेत्रात सुरु असलेल्या कामांची नियमितपणे पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे; पाऊस सुरू असताना वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुरळीतपणे व अव्याहतपणे सुरू राहावी याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळच्या वेळी करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. तसेच पावसाळ्या दरम्यान झाड पडल्यास बाबत दरवर्षीच्या पद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी उद्यान खात्याला दिले. तर दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. धोकादायक इमारतींबाबत ‘सुनिश्चित कार्यपद्धती’नुसार निर्धारित कार्यवाही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावी, असेही त्यांनी संबंधित खात्याला आजच्या बैठकीत दरम्यान आदेशित केले आहे.

..
या बैठकीच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक श्री. महेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकादरम्यान श्री. नार्वेकर यांनी प्रामुख्याने या वर्षातील घडामोडींची माहिती उपस्थितांना दिली. या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात पडलेला पाऊस, रेल्वे सह विविध वाहतूक सुविधांची माहिती, अपघात, झाडे पडणे इत्यादी बाबतची माहिती त्यांनी दिली.

यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे करण्यात येत असलेल्या व करण्यात येणा-या विविध कामांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘रस्ते व वाहतूक’ खात्याद्वारे येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर संगणकीय सादरीकरणद्वारे माहिती देण्यात आली.

..
याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग, आणि प्रमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, उद्यान खाते यांची माहिती देखील सादर करण्यात आली.

आजच्या बैठकीच्या शेवटी ‘पंतप्रधान स्वनिधी योजने’बाबत संबंधित खात्याच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना योजनेची माहिती दिली.
..
आजच्या बैठकीदरम्यान येत्या पावसाळ्यातील समुद्राला येणाऱ्या मोठ्याभरतीचे दिवसांना दरवर्षीच्या पद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल, विभाग कार्यालय व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग यांना दिले. हे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button