Uncategorizedबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई, दि. 25 :

महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सशक्ती डिजिटल व्हॅनचा’ शुभारंभ करण्यात आला.

 

मास्टरकार्ड अॅण्ड लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे 7 हजार 500 महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

मंत्री श्री. लोढा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

याप्रसंगी मास्टर कार्डचे संचालक रोहन सिरकर, लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार मोहम्मद अमीर एजाज, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, बँकेचे व्यवस्थापक मिलिंद देसाई, सीएससी महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक धवल जाधव, माजी नगरसेवक अभिजित सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद दुबे, सशक्ती टीमचे चंद्रकांत अहिरे, सनम शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button