नायगाव पूर्व पश्चिम वाहतुकीच्या मार्गाने जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण, थोर समाजसेवक “स्वर्गवासी श्री धर्माजी पाटील” यांचे नाव देण्याची मागणी
नायगाव पूर्व पश्चिम वाहतुकीच्या मार्गाने जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण, थोर समाजसेवक “स्वर्गवासी श्री धर्माजी पाटील” यांचे नाव देण्याची मागणी
मुंबई : नायगाव पूर्व पश्चिम वाहतुकीच्या मार्गाने जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, लवकरच सदर पुलाचे उदघाटन होऊन तो नागरिकांसाठी खुला होणार आहे. सदर पुलामुळे वसईतील लाखो लोकांना त्याचा फायदा होऊन घोडबंदर ला जाणारा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे, माननीय नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने सदर गेली अनेक वर्षे रखडलेल्या पुलाचे काम आज पूर्णत्वास आले आहे.
सदर उड्डाणपुलाला स्थानिक शिवसेना नेते आणि थोर समाजसेवक “स्वर्गवासी श्री धर्माजी पाटील” यांचे नाव देण्याची मागणी वसई तालुक्यातून जनतेकडून उठत होती तसेच शिवसेना उप विभाग प्रमुख नायगाव मायकल मोसेज आणि सुनील बलेकर यांनीही ह्या विषयात पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता त्याच अनुषंगाने शिवसेना संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी एका निवेदनाद्वारे वसई विरार महापालिका आयुक्त यांच्याकडे ही रीतसर मागणी केली आहे त्याच निवेदनाचे पत्र आज आयुक्तांना देण्यात आले.