बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे अलौकिक कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार करुया

क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे अलौकिक कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार करुया

-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 11 :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केले. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचे कार्य अलौकिक असून त्यांचे कार्य आणि विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जे.जे. वळवी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचे बळही दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. देशाला पुढे नेणारा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा विज्ञानवादी, सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महिला आज समाजाच्या अनेक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरत आहेत, महत्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, त्याचे श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या त्यागाला आहे. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून पुढेही सुरु राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button