मुंबई पोलिस प्रशासन यंत्रणेकडून ध्वनि प्रदुषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित
मुंबई पोलिस प्रशासन यंत्रणेकडून ध्वनि प्रदुषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित
प्रति,
श्री. संजय पांडे
मा. पोलिस आयुक्त
मुंबई
सस्नेह नमस्कार,
मुंबई पोलीस प्रशासन यंत्रणेकडून ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमआयोजित केले जात
आहेत. ध्वनि प्रदुषणाच्या विविध कारणांचा मुंबईकर आपल्या दैनंदिन आयुष्यात सामना करत असतात.
त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे प्रार्थना स्थळांमधून लाऊडस्पीकर वरुन केली जाणारी अजान होय.
कोणीही अजानच्या विरोधात नसून लाऊडस्पीकर वरुन मोठ्या आवाजात अजान दिल्यामुळे ध्वनि प्रदुषण होते.
या विषयात मुंबईतील जनतेच्या भावना आपल्यापर्यंत पोहचवण्याकरिता भाजपा मुंबईचे शिष्टमंडळ आपल्याला भेटू इच्छिते.
तसेच दि. २ एप्रिल रोजी येणाऱ्या हिंदू नववर्षानिमित्त (गुढीपाडवा) सालाबादप्रमाने मुंबईत ठिकठिकानी नववर्ष स्वागत यात्रांची तयारीजल्लोषात सुरु आहे . त्याचबरोबर १० एप्रिल रोजी श्री रामनवमी , १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती व १६ एप्रिल रोजी हनुमानजयंती हे सण साजरे करण्यासाठी संपूर्ण समाज उत्सुक आहे. तरी या कार्यक्रमांना परवानगी द्यावी ही विनंती .
धन्यवाद .